Home » अकोल्यात शेतकऱ्यांची लूट थांबवा; युवक काँग्रेसची मागणी

अकोल्यात शेतकऱ्यांची लूट थांबवा; युवक काँग्रेसची मागणी

by नवस्वराज
0 comment

अकोला : ऑनलाइन नोंदणीच्या नावावर पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी शेतकऱ्यांची लूट थांबवण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे अमर कुळे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे. तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून पी. एम. किसान सन्मान निधीच्या ऑनलाईन नोंदणीच्या नावावर सातशे ते अकराशे रुपयां पर्यंत खर्च येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांची सर्रास लूट केली जात आहे. आधीच शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या कपाशीवर वेगवेगळ्या रोगाचा प्रादुर्भाव आहे. खतांच्या किंमती वाढल्या आहेत. शेतमजुरी महागली आहे. त्यामुळे चारही दिशेने शेतकरी अडचणीत आहे. त्यातच ऑनलाइन नोंदणीच्या नावावर शेतकऱ्यांची तहसील कार्यालयासमोर आर्थिक फसवणूक होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधित सेतू सुविधा केंद्रावर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसचे अमर कुळे व अमर गवई यांनी दिला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!