Home » अकोल्यातील भारनियमन थांबवा : आ. सावरकर

अकोल्यातील भारनियमन थांबवा : आ. सावरकर

by नवस्वराज
0 comment

अकोला : आगामी काळातील सण उत्सव लक्षात घेता वेळीअवेळी होणारे अघोषित भारनियम बंद करण्यात करावे व नागरिकांना होणाऱ्या त्रासातून त्यांची मुक्तता करावी, यासंदर्भात वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावे, अशी विनंती जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.

केल्या दोन दिवसांपासून अकोला शहरात व ग्रामीण भागात अघोषित भारनियम देखभाल दुरुस्तीच्या नावावर, वीजतुडवडा पुरवठा या नावावर रात्री बेरात्री तसेच दिवसात केव्हाही अघोषित भारनियम सुरू आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे असून श्रावण मास, भाद्रपद गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी लक्षात घेता या बाबीकडे लक्ष घालून वीज वितरण अधिकाऱ्यांना सूचना देऊन नागरिकांना त्रास होणार नाही या संदर्भात योग्य आदेश निर्देशित करावे व नागरिकांना दिलासा द्यावा,अशी विनंती आमदार रणधीर सावरकर यांनी अकोलेकरांच्या वतीने फडणवीस यांच्याकडे केली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!