Home » धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मुंबई, पुणे, सोलापूर ते नागपूर विशेष रेल्वेसेवा

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मुंबई, पुणे, सोलापूर ते नागपूर विशेष रेल्वेसेवा

by नवस्वराज
0 comment

नागपूर : दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिना२दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर ते मुंबई, पुणे, सोलापूर ते नागपूर या चार एकेरी विशेष रेल्वेगाड्या विशेष शुल्कासह चालवणार आहे.

नागपूर – मुंबई वन वे स्पेशल

01018 वन वे स्पेशल नागपूर येथून दि. २४ ऑक्टोबर २०२३ (मंगळवार) रोजी २०.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल. नागपूर, अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे या गाडीला थांबे असतील. ५ द्वितीय आसनश्रेणी, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह १५ सामान्य द्वितीय श्रेणी (एकूण = २० आयसीएफ कोच) अशी गाडीची रचना असेल.

नागपूर- पुणे वन वे स्पेशल

01030 एकेरी विशेष गाडी दि. २४ ऑक्टोबर २०२३ (मंगळवार) रोजी नागपूर येथून २३.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १७.४५ वाजता पोहोचेल. नागपूर, अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड मार्ग आणि पुणे येथे गाडीला थांबे असतील. एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, १३ शयनयान, ८ सामान्य द्वितीय श्रेणीसह २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन (एकूण = २४ आयसीएफ कोच) अशी गाडीची रचना असेल.

नागपूर – मुंबई वन वे स्पेशल

01032 एकेरी विशेष गाडी दि. २५ ऑक्टोबर २०२३ (बुधवार) रोजी नागपूर येथून १५.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०८.१५ वाजता पोहोचेल. नागपूर, अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ही गाडी थांबेल. २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह २४ सामान्य द्वितीय श्रेणी (एकूण = २४ आयसीएफ कोच) गाडीला असतील.

सोलापूर – नागपूर वन वे स्पेशल

01029 एकेरी सुपरफास्ट स्पेशल दि. २४ ऑक्टोबर २०२३ (मंगळवार) रोजी २०.२० वाजता सोलापूर येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १३.०५ वाजता पोहोचेल. सोलापूर, कुरुडवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा आणि नागपूर येथे ही गाडी थांबेल. २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह २४ सामान्य द्वितीय श्रेणी (एकूण २४ आयसीएफ कोच) अशी गाडीची रचना आहे. आरक्षित डब्यांचे तिकीट बुकिंग दि. २० ऑक्टोबर २०२३ (शुक्रवार) पासून सुरू होईल.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!