Home » महानगरातील काही भागांना आपत्कालीन भारनियमनाचा फटका

महानगरातील काही भागांना आपत्कालीन भारनियमनाचा फटका

by नवस्वराज
0 comment

अकोला : गुरुवार सायंकाळी वादळ, वारे  तसेच  पाऊस नसतांना महानगरातील काही भागातील वीज पुरवठा खंडीत झाला. काही वेळ प्रतिक्षा केल्यावर महावितरण च्या टोल फ्रि क्रमांकावर तक्रार नोंदवल्यावर, वीज पुरवठा खंडीत होण्याचे कारण जाणून घेण्यासाठी अकोला मंडल कार्यालयाच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधला असता, वीजेच्या मागणीत अचानक वाढ झाल्यामुळे मागणी आणि पुरवठ्यातील समतोल राखण्यासाठी काही फिडर वर आपत्कालीन भारनियमन राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

गडंकी, गुलजारपूरा, अगरवेस, शिवचरणपेठ, किल्ला चौक, हरिहर पेठ, पोळा चौक, जुना बाळापूर नाका, लकडगंज, माळीपूरा, टिळकरोड, गांधीरोड, रजपूतपुरा, आदी भाग १ तासात पेक्षा जास्त वेळ अंधारात होता. बातमी लिहीपर्यंत हरिहर पेठ भागातील वीज पुरवठा सुरू झालेला नव्हता.

कंपनी तर्फे आज सायंकाळी राबविण्यात आलेल्या आपत्कालीन भारनियमनामुळे पुन्हा नियमित भारनियमन सुरू होणार? अशी चर्चा आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!