Home » रेल्वे पोलिसांमुळे ७३३ मुलांच्या चेहऱ्यावर हास्य

रेल्वे पोलिसांमुळे ७३३ मुलांच्या चेहऱ्यावर हास्य

by नवस्वराज
0 comment

अकोला : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ राबवित ७३३ मुलांची संकटातून सुटका केली आहे. यात ५१७ मुले आणि २१६ मुलींचा समावेश आहे. कौटुंबिक कलह व इतर कारणांमुळे कुटुंबापासून ही मुलं दुरावलेली होती.

घरातून निघलेली ही मुलं शहरात रेल्वे स्थानकांचा आधार घेतात. अशी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळल्यानंतर या मुलांच्या समस्या समजून घेतात. त्यांना त्यांच्या पालकांची भेट घालून दिली जाते. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या गेले सहा महिन्यांत काळात मध्य रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरून शासकीय रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ७३३ मुलांची सुटका करण्यात आली. त्यात भुसावळ विभागातील २०५ आणि नागपूर विभागीतील ९५ बालकांचाही समावेश आहे.

प्रवाशांचे रेल्वे गाडीत हरविले सामान, मोबाइल यासारखे सर्व सामान ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत आरपीएफ कर्मचाऱ्यांनी संबंधितांना परत केले आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये अंदाजे  ३९ लाख ५१ हजार ९३५ रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या १२८ सामान, वस्तू प्रवाशांना परत करण्यात आल्यात.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!