Home » रेल्वे रूळाखालचा मलमा वाहून गेला

रेल्वे रूळाखालचा मलमा वाहून गेला

by नवस्वराज
0 comment

अकोला : माना रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाच्या खालचा मलमा वाहून गेल्याने रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या अकोला-नागपूर-भुसावळकडे जाणारी रेल्वे वाहतूक संथ सुरू आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. माना रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे रूळाखालून वाहणाऱ्या नाल्याला देखील पूर आल्याने हा प्रकार घडला आहे. दरम्यान गस्तीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. काही रेल्वे स्थानकावरच थांबविण्यात आल्या आहेत. आणखी चार ते पाच तास रेल्वेचं काम सुरू राहणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!