Home » Akola News : 22 जानेवारीला शासकीय सुटी जाहीर करा! 

Akola News : 22 जानेवारीला शासकीय सुटी जाहीर करा! 

by नवस्वराज
0 comment

भूषण इंदोरीया

Akola | अकोला : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. अयोध्येसह संपूर्ण देशात हा ऐतिहासिक सोहळा अत्यंत उत्साहात साजरा होणारा आहे. हा महोत्सव साजरा करण्यासाठी 22 जानेवारी रोजी शासकीय सुटी जाहीर करावी, या आशयाचे निवेदन श्रीराम उत्सव समिती तर्फे निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांना गुरूवारी देण्यात आले. (Shriram Utsav Samitee demands for Holiday On 22 January at akola)

निवेदनात पुढे म्हटले आहे की, संपूर्ण देशासह अकोला जिल्ह्यात यादिवशी रामभक्तांतर्फे भजन, कीर्तन, पूजा, होमहवन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे 22 जानेवारीला शासकीय सुटी जाहीर करून जिल्ह्यात मांस विक्रीवरदेखील बंदी घालावी. निवेदनावर भरतकुमार मिश्रा, उमेश लख्खन, प्रविण अग्रवाल, आकाश सावते, अंबरिश शुक्ला, हर्ष कारिया आणि ऋषिकेश जकाते यांच्या स्वाक्षरी आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!