अकोला : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांची टाेळीच भाजपमध्ये असल्याची टीका करीत शिवसेनेने अकोल्यात आत्मक्लेश आंदाेलन केले.
जिल्हाधिकारी कार्यालय चाैकात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याचे त्यांच्या फाेटाेसह माेठे फ्लेक्स लावत शिवसेनेने भाजपचा निषेध नाेंदवला. आंदाेलनात जिल्हा प्रमुख गाेपाल दातकर, पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, पूर्वचे प्रमुख अतुल पवनीकर, महिला आघाडीच्या नेत्या ज्याेत्सना चाेरे, संताेष अनासने, माजी नगरसेवक गजानन चव्हाण, मंगेश काळे, गजानन बाेराळे, मुकेश मुरुमकार, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अभय खुमकर, अनिल परचुरे आदी सहभागी झाले होते. भाजप हा शिवद्राेही आहे, त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत असल्याची टीका शिवसेनेने केली. आंदाेलनात छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी- जय शिवाजी अशा घाेषणा दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्रात राहुनही भाजप नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहीत नाही. भाजप वारंवार महापुरुषांचा अपमान करीत आहे. त्यामुळे त्यांनी आधी इतिहासाचा अभ्यास करावा. याप्रकरणी संबंिधतांवर कार्यवाही न झाल्यास शिवप्रेमी आक्रमक हाेतील आणि त्याची जबाबदारी सरकारवरच राहिल, असा इशारा शिवसेनेचे पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा यांनी दिला.