Home » बाळासाहेब आणि दिघेंच्या विचाराने प्रेरित होत शिंदे गटात प्रवेश

बाळासाहेब आणि दिघेंच्या विचाराने प्रेरित होत शिंदे गटात प्रवेश

by नवस्वराज
0 comment

अकोला : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून पदाधिकारी आणि शिवसैनिक बाहेर पडत आहेत. उद्धव ठाकरे सेनाप्रमुख यांचे ढिसाळ नेतृत्व, काही पदाधिकाऱ्यांची अरेरावी, मिळणारी अपमानास्पद वागणूक, बदललेले धोरण यामुळे ओहोटी लागल्याचे प्रामाणिक शिवसैनिक सांगतात.

स्थानिक प्रमिलाताई ओक हाॅलमध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरीया, आमदार विप्लव बाजोरीया, आश्विन नवले, विठ्ठल सरप, योगेश अग्रवाल, शशिकांत चोपडे, मुरलीधर झटाले, योगेश बुंदेले आदी सेना पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

एलडीएन काॅलेजचे प्राचार्य राजेंद्र नेरकर, जय हनुमान ग्रुपचे कमल खरारे, श्री जागेश्वर गणेशोत्सव मंडळाचे गजानन रोकडे, मृत्युंजय काॅम्पयुटर इन्स्टिट्यूटचे शशिकांत सापधरे, जय भवानी मित्र मंडळ हरिहर पेठचे अजय सोळंके, प्रताप खरारे, माजी नगरसेवक सोमनाथ अडगावकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश घेतला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांच्या विचाराने प्रेरित होऊन प्रवेश घेत असल्याचे सांगितले. सेनेला शिंदे यांच्यासारखे कणखर नेतृत्व मिळाले असून, शिवसेना पुन्हा भरारी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसैनिकांच्या शिंदे गटातील प्रवेशाचा परिणाम आगामी अकोला महानगरपालिका निवडणुकीत जाणवेल. अनेक प्रभातील समिकरणे बदलू शकतात, असे सांगितले जात आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!