Home » उद्धव ठाकरे जे बोलतात ते समोरासमोर

उद्धव ठाकरे जे बोलतात ते समोरासमोर

फणडवीसांना फोन केल्याच्या मुद्द्यावर शिवसेनेचा खुलासा

by नवस्वराज
0 comment

मुंबई  : महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. २१ जूनला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावर शिवसेनेकडून खुलासा करण्यात आला आहे.“सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला अशा बातम्या प्रकाशित होत आहेत. या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये,” असे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कुटुंबासोबत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षा’ बंगला सोडला आणि मातोश्रीवर राहण्यास गेले. आपण मुख्यमंत्रिपदाचा मोह सोडला आहे, पण जिद्द नाही असा इशाराही त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!