Home » Ramdas Kadam : उद्धव ठाकरे यांची ईडी चौकशी व्हावी

Ramdas Kadam : उद्धव ठाकरे यांची ईडी चौकशी व्हावी

Shiv Sena : उद्धव ठाकरे यांचे एकेकाळच्या निकटवर्तीयाची मागणी

by नवस्वराज
0 comment

Mumbai : उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्याने केली आहे. उद्धव ठाकरे यांचे एकेकाळी अत्यंत निकटवर्तीय असलेले शिवसेना नेते रामदास कदम यांनी ही मागणी केली आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची अवस्था विझणाऱ्या दिव्यासारखी आहे. त्यामुळेच दोघे मनाला येईल ते बोलतात. उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी झाली पाहिजे, म्हणजे सगळा भ्रष्टाचार बाहेर येईल आणि सत्य महाराष्ट्राच्या जनतेला कळेल असे रामदास कदम म्हणाले.

रामदास कदम म्हणाले, मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत काम करण्याची संधी मिळाली, ते माझे परमभाग्य आहे. पण आता वडील आणि मुलगा दोघेजण जी बडबड करत आहेत. त्यांचे बोलणे, वागणे आणि टोमणे पाहिले तर एखादा दिवा विझताना जसा फडफडतो तशी दोघांची फडफड सुरू आहे. कलम 370 हटवावे, राम मंदिराचे निर्माण व्हावे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केल आहे. तरीही पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलण्याचे आणि टीका करण्याचे काम उद्धव आणि आदित्य ठाकरे सातत्याने करीत आहेत.

उद्धव ठाकरे अडीच वर्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होते. त्यांना काम करण्याची संधी होती. त्यावेळी नालायक मुख्यमंत्री कोण ठरले? तर हा माणूस. 40 पैकी एकाही आमदाराने 50 खोके घेतल्याचे उद्धव ठाकरेंनी सिद्ध केले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेल, असे आव्हान रामदास कदम यांनी केले. आम्हाला फक्त बदनाम केले जात आहे. आपले मुख्यमंत्रिपद का गेले? पद का सोडावे लागले? 40 स्वतःच्या पक्षाचे आमदार 13 खासदार आणि 10 अपक्ष आमदार का सोडून गेले? याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्या नेत्यांना घडवले त्यांना संपवण्याची सुपारी उद्धव ठाकरेंनी घेतलीअसल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला.

आम्ही पुष्कळ मिठाईचे खोके दिले. मात्र तिथे धबधबा सुरू रहावा लागतो. पुढील 10 दिवसांत उद्धव ठाकरेंबरोबर असलेले आमदार एकनाथ शिंदेंना साथ देतील. उद्धव ठाकरेंना फक्त टोमणेच मारता येतात. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी केली आहे की, उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी व्हावी. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की भ्रष्टाचारी कोण आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्याच अनुषंगाने काम सुरू असल्याचे रामदास कदम म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!