Home » Mumbai News : उद्धव ठाकरेंवर भडकल्या शर्मिला ठाकरे 

Mumbai News : उद्धव ठाकरेंवर भडकल्या शर्मिला ठाकरे 

by नवस्वराज
0 comment

Mumbai | मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांची मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या गुढ मृत्यू प्रकरणाची फाइल पुन्हा उघडण्यात आली आहे. आमदार नीतेश राणे हे सातत्याने आमदार आदित्य ठाकरेंवर आरोप करतात. मात्र त्यांच्या काकू मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली. त्या म्हणाल्या आदित्य असे काही करेल, असे वाटत नाही. यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

शर्मिला ठाकरे यावर म्हणाल्या की, मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला परंतु उद्धव ठाकरेंनी आम्हाला आभार प्रकट करण्याची संधी कधीच दिली नाही. उद्धव ठाकरे लहान भावाला बोलतात, टोमणे मारण्याची एकही संधी ते सोडत नाही. ( Sharmila Thackeray got upset on Uddhav Thackeray in Aditya Thackeray at Mumbai)

अदानींना प्रश्न केला तर ‘चमचे आवाज करू लागलेत’, असा खोचक टोमणा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना मारला. शर्मिला ठाकरे पुढे म्हणाल्या की, दीड वर्षांपूर्वी अदानी मातोश्रीवर कशासाठी आले होते? तुम्ही अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी चांगले निर्णय घेण्यापासून कोणी रोखले होते? विरोधीपक्ष आरक्षणाची मागणी करत होते. मग मराठा आरक्षण का दिले नाही? धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास तुमच्या कार्यकाळात का केला नाही? असे परखड प्रश्न शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना विचारले आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!