Home » सामर्थ्य फाऊंडेशन करणार अकोल्याचे नाव उज्ज्वल

सामर्थ्य फाऊंडेशन करणार अकोल्याचे नाव उज्ज्वल

by नवस्वराज
0 comment

अकोला : राज्यातच नव्हे तर देशात अकोल्याचे नाव उज्ज्वल करण्याचे कार्य सामर्थ्य फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात येईल, असा प्रण फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. निमित्त होते, सामर्थ्य फाऊंडेशनच्या स्थापनेचे.

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, कृषी क्षेत्रात ही सेवाभावी संस्था काम करणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अनाथांचे नाथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. शंकरबाबा पापळकर यांच्या हस्ते संस्थेचा उद्घाटन सोहळा अकोल्यातील आरएलटी कॉलेजच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी जिल्हाधिकारी निमा अरोरा, बेरार जनरल एज्युकेश सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव पवनकुमार माहेश्वरी, आरएलटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी उपस्थित होते.

डॉ. पापळकर म्हणाले की, सामर्थ्य फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मन आणि आचरण शुद्ध ठेवावे. पदाधिकाऱ्यांनी श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावचे दिवंगत अध्यक्ष शिवशंकरदादा पाटील आणि संत गाडगेबाबा फाऊंडेशनचे अवचितराव देशमुख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. संस्थेचा नावलौकिक संपूर्ण देशात करावा. यासाठी जोमाने प्रयत्न करावा. कोणतेही अनुदानाचा स्वीकार न करता निस्वार्थपणे कार्य करीत अकोला शहराचे नाव उज्ज्वल करण्याची शपथ घ्यावी.

याप्रसंगी त्यांनी अंगणवाडी शिक्षण पद्धतीच्या जनक श्रीमती ताराबेन मश्रुवाला यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. निमा अरोरा, अॅड. मोहता, प्रा. खडसे यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डाॅ भाले यांनी व उपस्थित मान्यवरांनी शंकरबाबांच्या कार्याचा गौरव केला. फाऊंडेशनने बाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत काम करावे, असे विचार सर्वांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबोध देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. संतोष भोरे यांनी केले. राजू उखळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!