Home » भंडारा | तिघांची हत्या; सात जणांना जन्मठेपेची शिक्षा

भंडारा | तिघांची हत्या; सात जणांना जन्मठेपेची शिक्षा

by नवस्वराज
0 comment

भंडारा : तुमसर शहरातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा निकाल भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावला आहे. याप्रकरणी तिघांची हत्या करणाऱ्या सात जणांना दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय.

खळबळ उडविणाऱ्या या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद केला होता. या हत्याकांड प्रकरणी सात आरोपींवर आरोप सिद्ध झाले होते. रामकृष्ण नगर येथे राहणाऱ्या संजय चिमणलाल सोनी (वय ४७), पुनम संजय सोनी (वय ४३), ध्रुमिल संजय सोनी (वय ११) या एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या झाली होती.

संजय सोनी सराफाचा व्यवसाय करत होते. व्यवसायानिमित्त ते सोन्या-चांदीची दगिन्यांची विक्री करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात जात होते. नेहमीप्रमाणे २५ फेब्रुवारी २०१४ ला संजय सोनी यांनी चालकाला गोंदियाला जाण्यासाठी फोन केला. संजय सोनी गोंदियाला कशाला जातात हे चालकाला माहिती होते. त्यामुळे त्याने कट रुचून त्यात सहा जणांना सहभागी करुन घेतले.

संजय सोनी २६ फेब्रुवारीला चालकाला घेऊन गोंदियाला गेले. कामे आटोपून ते रात्री गावी तुमसरला परत निघाले. गोंदिया जिल्ह्यातील बिरसी फाट्याजवळ चालकाने लघुशंकेच्या बहाण्याने कार थांबवली. त्या ठिकाणी चालकांचे तीन साथीदार आधीच थांबले होते. त्याने त्यांना तुमसरपर्यंत जायचे आहे असे सांगून गाडीत बसविले. गाडीत नायलॉनच्या दोरीने गळा आवळून संजय सोनी यांची हत्या केली होती.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!