Home » उन्हाचे चटके वाढले, शाळांना सुटी : केसरकर

उन्हाचे चटके वाढले, शाळांना सुटी : केसरकर

by नवस्वराज
0 comment

नागपूर : सर्वत्र उन्हाचे चटके वाढल्याने परीक्षा आटोपलेल्या शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत नागपुरात माहिती दिली. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने केसरकर नागपुरात आले होते.

२१ एप्रिल २०२३ पासून ही सुटी असेल असे केसरकर यांनी सांगितले. यासंदर्भातील अधिकृत आदेश काढण्यात येतील. ज्या शाळांची परीक्षा सुरू आहे, त्यांना परीक्षा संपताच तत्काळ उन्हाळ्यच्या सुट्या देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. राज्यात सर्वत्र पारा चाळीशी पार गेला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे केसरकर यांनी ‘नवस्वराज’शी बोलताना सांगितले.

राज्यातील बहुतांशी शाळांमधील परीक्षा आणि सत्र पूर्णपणे आटोपले आहे. सीबीएसईच्या शाळांच्या परीक्षाही झाल्या आहेत. त्यामुळे उष्णतामान पाहता अधिक दिवसांपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून विनाकारण सत्र लांबविण्यात तथ्य नाही असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्तांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!