Home » Mumbai News : मुलांच्या झोपेचे वेळापत्रक बिघडल्याने शाळेच्या वेळात बदल करावा!

Mumbai News : मुलांच्या झोपेचे वेळापत्रक बिघडल्याने शाळेच्या वेळात बदल करावा!

by नवस्वराज
0 comment

Mumbai | मुंबई : शालेय शिक्षण विभागाच्या सहा प्रोत्साहानात्मक योजनांचा शुभारंभ मंगळवार 5 डिसेंबरला राजभवनात येथे झाला. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सुरज मांढरे हे देखील उपस्थित होते. (School Education Department Six Promotional Schemes Inauguration Function At Rajbhavan Mumbai)

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’, गोष्टींचा शनिवार’, आनंददायी वाचन’, ‘दत्तकशाळा उपक्रम’, ‘माझी शाळा माझी परसबाग’, ‘स्वच्छता माॅनिटर-2’, या सहा प्रोत्साहनात्मक योजनांचा शुभारंभ तसेच मुंबई महानगरपालिकेच्या शाळेच्या नवीन ईमारतीचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी यासाठी आवश्यक पावले उचलावीत. वाचनालयातील पुस्तके जुनी किंवा कालबाह्य झाली आहेत. वाचनालयांना नवसंजीवनी देण्यासाठी इंटरनेट व कॉम्प्युटर सुविधा द्यावी तसेच ग्रंथालय दत्तक योजना देखील सुरू करण्यात यावी. अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घालताना राज्यपाल म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या दफ्तरांचे ओझे कमी होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी पुस्तक विहीन शाळा, ई-वर्गांना प्रोत्साहन द्यावे. शाळांच्या गुणवत्तेनुसार श्रेणीकरण करावे. त्यांनी पुढे सांगितले की, सर्वांच्या झोपेचे वेळापत्रक बदलले आहे. मुलेदेखील रात्री उशिरापर्यंत जागे रहातात त्यांना सकाळी शाळेसाठी लवकर उठावे लागते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप पूर्ण व्हावी या दृष्टिकोनातून शाळेच्या वेळेत बदल करण्याचा विचार करावा अशी सूचना रमेश बैस यांनी केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!