Home » Railway Recrutment : विद्यार्थ्यांना रेल्वेतील नोकऱ्यांचे वावडे का?

Railway Recrutment : विद्यार्थ्यांना रेल्वेतील नोकऱ्यांचे वावडे का?

MNS Program : प्रा. सतिश फडके यांनी मार्गदर्शन सत्रात विचारला प्रश्न

by नवस्वराज
0 comment

Akola : राज्यसेवा आयोग, लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना विशेषतः मराठी विद्यार्थ्यांना रेल्वे खात्यातील नोकऱ्यांचे वावडे का आहे? असा अंतर्मुख करणारा मार्मिक प्रश्न प्रख्यात वक्ते प्रा. सतीश फडके यांनी उपस्थित करून विद्यार्थ्यांना व पालकांना विचार करण्यास बाध्य केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आयोजित रेल्वे भरती-2024 ऑनलाइन अर्ज भरणी व परीक्षा मार्गदर्शन शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. स्थानिक श्रीमती लरातो वाणिज्य महाविद्यालयात आयोजित या शिबिराचे अध्यक्ष म्हणून दी बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा, प्रमुख पाहुणे म्हणून सीए आशिष बाहेती, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष व अकोला संपर्क प्रमुख विठ्ठल लोखंडकार, प्रा. डॉ. वर्षा सुखदेवे, रुहाटीया ग्रुपचे सिद्धार्थ रुहाटीया, राम पाटील, हास्यकवी किशोर बळी आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. फडके यांनी रेल्वे खात्याची व्याप्ती, एकूण बजेट, भविष्यातील प्रस्तावित प्रकल्पांमध्ये नोकऱ्यांची प्रचंड उपलब्धता आदींबाबत विस्तृत विश्लेषण केले. रेल्वे खात्यातील कर्मचाऱ्यांच्या देशभरात कुठेही बदल्या होऊ शकतात, या सर्वांत मोठ्या गैरसमजाबाबत खुलासेवार माहिती दिली. केवळ रेल्वे भरतीच्या तयारीवर पाच विविध परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात हेसुद्धा निक्षून सांगितले.

विठ्ठल लोखंडकार यांनी भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून असेच विविध परीक्षा मार्गदर्शन शिबिर मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपस्थिताना संबोधित करताना केले. यावेळी उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. मनविसेचे विकास मोळके यांनी परीक्षा लिंक, ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्र अपलोड करणे याबाबत ‘पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन’ द्वारे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी केले. सूत्रसंचालन महानगर अध्यक्ष सौरभ भगत यांनी केले. जिल्हा सचिव ललित यावलकर यांनी आभार प्रदर्शन केले.

याप्रसंगी रणजित राठोड, प्रशंसा अंबेरे, संगीता चव्हाण, राजेश पिंजरकर, मुकेश धोंडफळे, सतीश खारके, प्रदीप मस्तुड आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल भेंडारकर, आकाश शेजे, सोनू अवचार, राजेश राठी, मोहन मते यांनी  परिश्रम घेतले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!