Home » पेपर चेकिंगला दांडी; 200 प्राध्यापकांना अमरावती विद्यापीठाची नोटिस

पेपर चेकिंगला दांडी; 200 प्राध्यापकांना अमरावती विद्यापीठाची नोटिस

by नवस्वराज
0 comment

अमरावती : उत्तर पत्रिका तपासण्यास हयगय केल्याप्रकरणी अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्यापरीक्षा व मूल्यांकन विभागाने 200 प्राध्यापकांना नोटीस बजावली आहे.

हिवाळी परीक्षा २०२२ नुकत्याच आटोपल्या. विद्यापीठाच्या परीक्षा अकोला,अमरावती, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यातील १७७ केंद्रावरून घेतल्या गेल्यात. साधारणत महिनाभर चाललेल्या या परीक्षा 16 जुलै रोजी संपल्या. उत्तर पत्रिका तपासण्यासाठी संबंधित विषयाच्या प्राध्यापकांना विद्यापीठाकडून मूल्यांकनासाठी पत्रही पाठवण्यात आले. परंतु बऱ्याचश्या प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या या नोटीसेकडे दुर्लक्ष करत विद्यापीठात मूल्यांकनास जाण्याचे टाळले . त्यामुळे विद्यापीठाचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाने विषय प्राध्यापकांना नोटीस पाठवून उत्तर पत्रिका तपासनीस गैरहजर राहण्याचा खुलासा सात दिवसांमध्ये मागितला आहे. प्राध्यापकांनी दिलेला लेखी खुलासा समाधानकारक नसल्यास विद्यापीठ कायद्यानुसार गैरहजर राहणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन कपात, सेवा पुस्तकात नोंद अशा प्रकारची कार्यवाही केल्या जाऊ शकते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!