Home » Sangli News : कानपूर मधील व्यवसायिकाचे 16 कोटींचे सोने पळवणारे दोघे सांगलीचे

Sangli News : कानपूर मधील व्यवसायिकाचे 16 कोटींचे सोने पळवणारे दोघे सांगलीचे

by नवस्वराज
0 comment

Sangli | सांगली : उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका गलाई व्यवसायिकाचे 16 कोटींचे सोने घेऊन दोघे पसार झाले आहेत. दोघे संशयित हे सांगली जिल्ह्यातील आहेत. संपत शिवाजी लवटे आणी महेश विलास मस्के अशी त्यांची नावे आहेत. संपत हा खानापूर तालुक्यातील बामणी गावचा तर महेश हा पलूस तालुक्यातील नागराळे या गावचा असून दोघेही फरार आहेत. (Sangli District Two Persons Flee With 16 Crore Gold Of Businessman Of Kanpur Uttar Pradesh)

सीसीटीव्ही फूटेजमध्ये हे दोघे सोने नेताना दिसल्यामुळे कानपूर पोलीसांची चमू त्यांचा शोध घेण्यासाठी सांगलीत दाखल झाली आहे. कानपूर पोलीस, सांगली पोलिसांच्या मदतीने संपत आणि त्याचा सहकारी महेश यांचा शोध घेत आहेत. कानपूर तसेच स्थानिक पोलीस संशयितांच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी करत आहेत. पोलीसांनी संपत आणी महेशचे फोटो देखील जारी केले आहेत, परंतु अद्यापही दोघांचा सुगावा पोलीसांना लागलेला नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!