Home » पुरुष म्हणून वावरणारा वाशिमचा संघ कार्यकर्ता निघाला स्त्री 

पुरुष म्हणून वावरणारा वाशिमचा संघ कार्यकर्ता निघाला स्त्री 

by नवस्वराज
0 comment

वाशीम : वाशिम शहरात सागर नावाने परिचित असलेला युवक विविध सामाजिक कामांमध्ये सक्रिय आहे. गेली अनेक वर्षे त्याने स्त्री असल्याचे रहस्य मनात दाबून टाकले. परंतू सत्य किती दिवस झाकले जाणार म्हणून त्याने धाडस केले आणि तब्बल ३८ वर्षानंतर आपण पुरूष नसून एक स्त्री असल्याचा खुलासा मोठा मनाने जाहीर केला. यासाठी नुकताच येथील एक लॉनमध्ये ‘तेरा तुझको अर्पण’ असा अभिनंदन सोहळा देखील पार पडला.

सोहळ्यास अंजनगाव सुर्जी येथील अनंत विभूषित १००८ आचार्य जितेन्द्रनाथ महाराज (सभाचार्य विश्व मांगल्य सभा) यांची उपस्थिती होती. तसेच योगी शंकरनाथ महाराज (शिव गोरखनाथ संस्थान वाशीम) मोहन महाराज पाठक, प्रशांतजी हरताळकर (मार्गदर्शक विश्व मांगल्य सभा) डॉ. वृषाली जोशी (अ. भा. संगठन मंत्री विश्व मांगल्य सभा) मधुरा ताई लेंधे(विदर्भ प्रान्त अध्यक्षा,विश्व मांगल्य सभा) बालाजी महाराज देव, ह. भ. प नामदेव महाराज काकडे, ह. भ.प सागर महाराज पारिस्कर, ह. भ.प विजय महाराज गवळी, पंकज महाराज देव तसेच वाशीम येथील अनेक नागरीक या अनोख्या सोहळ्याला उपस्थित होते.

सर्वपरिचित असलेले सागर चुंबळकर हे नेहमीच धार्मिक तसेच समाज कार्यात अग्रेसर. वयाच्या आठव्या वर्षा पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये जात होते व त्या नंतर त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे दायित्व सांभाळले व आपले संपूर्ण कार्य पणाला लावले. तसेच मुलींना संघटित करून संरक्षणासाठी त्यांना दुर्गा वाहिनीच्या शौर्य प्रशिक्षणासाठी पाठवले. या सगळ्या कार्यामधे विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. रक्तदाता व गरजू रुग्णांना रक्त पुरवण्याचे काम देखील सातत्याने सुरू ठेवले.

हे सगळे करत असतांना सागर यांनी आपली खरी ओळख समाजापासून लपवून कार्य केले. मुळात मुलगी असताना मुलगा म्हणून वयाची 38 वर्ष समाजकार्यात घालविली. बालपणापासून सागर हा मुलांप्रमाने राहत आला. सर्व खेळ  मुलांचेच खेळला. पण काही लोकांच्या मार्गदर्शनामुळेच ३८ वर्षानंतर त्यांने स्वतःची खरी ओळख समाजापुढे आणली व या पुढे मुळ रुपात म्हणजे स्त्री म्हणूनच जगणार आहे. यासाठी सगळ्यांच्या साक्षीने साधु संतांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.  संतांच्या उपस्थितीत सागरचे संगरा असे नामकरण करून शास्त्रानुसार विधी सुद्धा करण्यात आला. यापुढे त्या कु. संगरा चुंबळकर या नावाने ओळखल्या जाणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!