Home » राज्यातील सर्व सरकारी शाळांना आता एकच गणवेश

राज्यातील सर्व सरकारी शाळांना आता एकच गणवेश

by नवस्वराज
0 comment

मुंबई : राज्यातील सर्व सरकारी शाळांना यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एकच गणवेश राहणार आहे. सध्या वेगवेगळ्या सरकार शाळांना वेगवेगळे गणवेश आहेत. लवकरच सर्व विद्यार्थ्यांना एकसारखा गणवेश असेल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवार, २३ मे २०२३ रोजी केली.

सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये एकसमानता दिसावी यासाठी एकच गणवेशाचा प्रस्ताव समोर आला होता. मंत्रिमंडळात यासंदर्भात चर्चा झाल्यानंतर राज्यातील सर्व शासकीय शाळांना एकसमान गणवेश ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. फिक्कट निळ्या रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा पॅन्ट असा गणवेश मुलांसाठी राहणार आहे. मुलींसाठी फिक्कट निळ्या रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा फ्रॉक राहणार आहे. सरकारने निर्णय जाहीर केल्याने आता राज्यभरातील ६४ लाख २५ हजार विद्यार्थ्यांचा गणवेश बदलणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!