अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला प्रवेशीत असलेल्या ४० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची २०१४ मध्ये रात्रभर रॅगींग घेण्यात आली हाेती. या प्रकरणात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन. डी. जाधव यांच्या न्यायालयाने रॅगींग घेणाऱ्या ९ प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांची सबळ पुराच्याअभावी निर्दाेष सुटका केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३१ जानेवारी २०१४ राेजी एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला असलेल्या ४० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची रॅगींग घेण्यात आली हाेती. या प्रकरणी सिटी काेतवाली पाेलिसांनी रॅंगीग घेणाऱ्या यश ओमप्रकाश भुतडा, शुभम शांतीलाल मालवीया, डाॅ. निखील दिलीप पिसे, डाॅ. हेमंत रमेश घाटाेळे, डाॅ. मीलींद अशाेक देशमूख, डाॅ. शुभम यशवंत बनकर, डाॅ. धनंजय मांगटे, डाॅ. कीरण महादेव पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला हाेता.
सहाय्यक पाेलिस निरीक्षक ए. डाेइफाेडे यांनी तपास करून दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन. डी. जाधव यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी ९ डाॅक्टरांची निर्दाेष मुक्तता केली. या प्रकरणात न्यायालयाने १६ साक्षीदार तपासले हाेते. या प्रकरणात नऊ डाॅक्टरांच्यावतीने अॅड. प्रविण कडाळे यांनी कामकाज पाहिले.