Home » शरद पवारांसाठी त्याग करायला तयार आहोत : जितेंद्र आव्हाड

शरद पवारांसाठी त्याग करायला तयार आहोत : जितेंद्र आव्हाड

by नवस्वराज
0 comment

मुंबई : शरद पवार यांना या वयात त्रास देऊ नका, मी आणि जयंत पाटील बाजूला होतो, तुम्हाला राजकारणात दिसणार नाही, आम्हाला पद नको, शरद पवारांसाठी त्याग करायला तयार आहोत. मात्र तुम्ही परत या, असे आवाहन राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला केले आहे. येवले दौऱ्यावर निघताना आव्हाड पत्रकारांशी बोलत होते.

आमच्या सारख्या लोकांनी शरद पवार यांना घेरले असे त्यांना वाटते. पण मी शरद पवार यांच्या गुप्त किंवा मुख्य बैठकांना कधीच नसायचो. माझी इच्छाही नसायची. कारण माझे ठरले होते की त्यांनी ठेवले तर त्यांच्यासोबत राहायचे. ते जो निर्णय घेतील त्यांच्यासोबतच राहायचे. त्यामुळे मी बैठकांना जायचे टाळायचो. आपल्या कानावर काही गोष्टी पडतील, त्या सहन होणार नाहीत. त्यामुळे आपण लांबच राहावे. पण आता जर ते म्हणत असतील आम्ही आवतीभोवती आहे म्हणून त्रास होतो, तर आम्ही बाजूला होतो, असे आव्हाड म्हणाले.

आमच्या सारख्या लोकांनी शरद पवार यांना घेरल्यामुळे हे सर्व झाले आहे, तर तुम्ही परत या…मी निघून जाईन, अशी मी येवल्यात जाऊन शपथ घेईन, असे त्यांनी सांगितले. ७५ वर्षे काम केल्यानंतर माझे बाबा घरी बसले आणि ते परत कधी उठले नाही. त्यामुळे काम न करता घरी बसल्यावर काय होते हे मी अनुभवले आहे. त्यामुळे जादूगार असलेल्या पवार साहेबाना घरी बसा बोलणे हे मनाला वेदना देणारे आहे, असे ते म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!