Home » आरबीआयने रेपो दर वाढविला; बँकांचे कर्ज महागणार

आरबीआयने रेपो दर वाढविला; बँकांचे कर्ज महागणार

by नवस्वराज
0 comment

मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दर 50 बेस पॉईंटने वाढविण्यात आल्याची घोषणा शुक्रवार, ५ ऑगस्ट रोजी केली. आरबीआयने रेपो दर वाढविल्याने देशभरातील बँकांमधुन मिळणारे कर्ज व त्यावरील व्याजदरात वाढ होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या वेळी अशी वाढ झाली होती, तेव्हा किरकोळ चलनवाढीचा दर सात टक्क्यांच्या वर राहिला आहे. मध्यवर्ती बँकेने रेपो दरात वाढ केल्याने बँका कर्जावरील व्याजदरात वाढ करू शकतात, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात 0.40 टक्के आणि जूनमध्ये 0.50 टक्के वाढ केली होती. सततच्या वाढीनंतर रेपो दर 4.90 टक्क्यांवर गेला होता. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, जगभरातील महागाई विक्रमी पातळीवर आहे. भारत महागाईच्या उच्च दराचा सामना करत आहे. जून हा सलग सहावा महिना होता जेव्हा किरकोळ महागाईने रिझव्‍‌र्ह बँकेची वरची मर्यादा ओलांडली होती. भू-राजकीय घडामोडींमध्ये झपाट्याने होणारे बदल, जागतिक अन्नधान्याच्या किमतीतील नरमाई, युक्रेनमधून गव्हाची निर्यात पुन्हा सुरू होणे, देशांतर्गत बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या किमती कमी होणे आणि चांगल्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकांच्या पेरणीला आलेली तेजी. महागाईच्या आघाडीवर दिलासा मिळू शकतो. मात्र, त्यानंतरही किरकोळ महागाईचा दर चढाच राहणार आहे.

रेपोरेट वाढल्याचे परिणाम
रेपो दर म्हणजे आरबीआयकडून बँकांना ज्या दराने कर्ज दिले जाते आणि बँका या कर्जातून ग्राहकांना कर्ज देतात. रिव्हर्स रेपो रेट तो दर आहे ज्यावर बँकांना आरबीआयकडून ठेवींवर व्याज मिळते. रेपो रेट वाढला म्हणजे बँकेकडून अनेक प्रकारची कर्जे महाग होतात.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!