Akola | अकोला : रेल्ले मार्गाचे काम सुरू असल्यामुळे अकोला मार्गावरील सात रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची अडचण होणार आहे. (Railway Track Work In Progress As Such Seven Trains Running From Akola Are Cancelled Which Will Cause Inconvenience To Travellers)
नागपूर विभागातील राजनांदगाव- कळमना रेल्वे विभागादरम्यान कन्हान रेल्वे स्थानकावर तिसरी लाईन टाकण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे कडून नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे 14 डिसेंबरपर्यंत अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात अकोला मार्गावरील सात गाड्यांचा समावेश आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या.
– 13425 मालदा टाऊन-सूरत एक्सप्रेस : 12 डिसेंबर
– 13426 सूरत-मालदा टाऊन एक्सप्रेस : 4 व 11 डिसेंबर
– 20823 पुरी- अजमेर एक्सप्रेस 4, 7 व 11 डिसेंबर
– 20824 अजमेर-पुरी एक्सप्रेस : 7, 12 व 14 डिसेंबर
– 20821 पुणे-संत्रागाछी हमसफर एक्सप्रेस : 11 डिसेंबर
– 20822 संत्रागाछी- पुणे हमसफर एक्सप्रेस : 9 डिसेंबर
– 12101 एलटीटी शालीमार एक्सप्रेस : 8, 9, 11व 12 डिसेंबर
– 12102 शालीमार-एलटीटी एक्सप्रेस : 10, 11, 13 व 14 डिसेंबर
– 12811 एलटीटी-हटिया एक्सप्रेस : 10 व 11 डिसेंबर
– 12812 हटिया- एलटीटी एक्सप्रेस : 8 व 9 डिसेंबर
– 22905 ओखा-शालीमार एक्सप्रेस : 10 डिसेंबर
– 22906 शालीमार-ओखा एक्सप्रेस : 12 डिसेंबर
– 12869 सीएसएमटी-हावडा एक्सप्रेस : 10 डिसेंबर
– 12870 हावडा- सीएसएमटी एक्सप्रेस : 8 डिसेंबर