Home » मध्य रेल्वेच्या अनेक फेऱ्या धुक्यामुळे विस्कळीत

मध्य रेल्वेच्या अनेक फेऱ्या धुक्यामुळे विस्कळीत

by नवस्वराज
0 comment

अकोला : मध्य रेल्वेच्या अनेक फेऱ्या दाट धुक्यामुळे विस्कळीत झाल्या आहेत. यातील अनेक फेऱ्या नागपूर ते मुंबई मार्गावरील आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावर मंगळवारी ३३ तर बुधवारी २८ रेल्वे फेऱ्या धुक्यामुळे प्रभावित झाल्या. अकोल्यात धुक्यामुळे ७ फेऱ्या प्रभावित झाल्या आहेत.

धुक्यामुळे विलंबाने धावलेल्या रेल्वे फेऱ्यांमध्ये यशवंत पुरी एक्स्प्रेस, मुंबई एलटीटी एक्स्प्रेस, हावडा- मुंबई मेल, ओखा- पुरी एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेस, हावडा- अहमदाबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस, मुंबई एसी दुरांतो यांचा समावेश आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!