Home » अकोट अकोला शटल रेल्वे सुरू होणार 23 नोव्हेंबरला

अकोट अकोला शटल रेल्वे सुरू होणार 23 नोव्हेंबरला

by नवस्वराज
0 comment

अकोला : अकोट-अकोला रेल्वे सुरू करण्याचा निर्णय झाला असून 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्लॅटफॉर्म नंबर सहा येथे अकोला रेल्वे सेवेचा शुभारंभ केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, हैदराबादचे डीआरएम, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल उपस्थितीत राहणार आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपेंद्र सिंह, आमदार रणधीर सावरकर यांच्यासोबत बैठक झाली.  गांधीग्राम येथील पूल दुरुस्तीला वेळ असल्यामुळे नवीन पूल सुरू करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे.  नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांनी मुंबईत रेल्वेमंत्री अश्विन वैष्णवी, रेल्वेमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला.

जनतेची मागणी लक्षात घेता आठ डब्याची रेल्वे अकोट अकोला शटल रेल्वे सेवा सुरू केली. या रेल्वे सेवेच्या दोन फेऱ्या 23 नोव्हेंबर बुधवार पासून सुरू होणार आहे.  रेल्वे मार्गावर शिवणी येथे शेड उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्लॅटफॉर्म नंबर सहा वरील रेल्वे शेड वाढवण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.

अकोट-अकोला रेल्वे सेवेचे तिकीट 30 रुपये राहणार आहे. रेल्वे सेवेची ठेवलेली वेळसुद्धा बदलण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.  बैठकीला आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल यांनी दक्षिण व मध्य रेल्वे यांच्यामधील निर्माण होणारी अडचण यावेळी अधिकाऱ्यांच्या जवळ व्यक्त केली. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे नेते अशोक गुप्ता, वसंत बाछुका, ज्ञान प्रकाश खंडेलवाल, सुभाष सिंग ठाकूर, किशोर पाटील जयंत मसने शंकरराव वाकोडे गिरीश जोशी माधव मानकर विवेक, भरणे राजेश, अनुप धोत्रे, संजय जिरापुरे, संजय गोडा संजय गोटफोडे, गणेश अंधारे, संतोष पांडे, देवाशिष काकड, नीलेश निनोरे, राजेंद्र गिरी, अमोल गोगे, विकी ठाकूर, अक्षय जोशी, गजानन लोणकर, प्रदीप नंदापुरे, राजेश मिश्रा, भूषण सारसे आदी उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!