Home » ड्रग्सच्या विळख्यात अडकतेय देशातील तरूण पिढी

ड्रग्सच्या विळख्यात अडकतेय देशातील तरूण पिढी

by नवस्वराज
0 comment

अकोला : आपल्या देशातील तरूण पिढीचा ओढा ड्रग्सकडे वाढला आहे. ब्राऊनशुगर, मॅन्ड्रेक्स, हेरोइन, कोकेन व कित्येक मादक पदार्थ आहेत. नशा येण्यासाठी झोपेच्या गोळ्या, क्लोरोफाॅर्म व अल्कोहोलचे जास्त प्रमाण असलेले औषध, लिक्विड थिनर, आयोडेक्सचे सेवन करतात. आता घातक केमिकल द्वारा सिंथेटीक ड्रग्सची निर्मिती केली जाते.

पूर्वी पंजाब आणि आसाममध्ये अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण जास्त होते, पण आता हे लोण संपूर्ण देशात पसरले आहे. तरूणांची अंमली पदार्थांची गरज रेव्ह पार्टी व घरपोच सेवेच्या माध्यमातून पूर्ण करणारे मोठे जाळे सक्रिय आहे. भारतात जवळपास ७० टक्के ड्रग्स पाकिस्तानातून येतात. पाकिस्तानात अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या खुप मोठी आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, लाओस, थायलंड, इराण आणि मेक्सिको हे मादक द्रव्यांचा प्रसार करणारी राष्ट्र आहेत. मेक्सिकोच्या ड्रग्स माफियांकडे ६०० विमान, ७० हजारावर सैनिक आणि अत्याधुनिक शस्त्रे आहेत. संघर्षात दररोज १२० हत्या होतात. कोरोना लाॅकडाऊनमध्ये देखील हा व्यवसाय जोरात सुरू होता. वार्षिक उलाढाल अंदाजे अडीच लाख कोटींची आहे. कोणत्याही राष्ट्राचे खच्चीकरण तीन प्रकारे करता येते. प्रत्यक्ष युद्ध करून, दहशतवादाने अंतर्गत अशांतता निर्माण करून किंवा तरूण पिढीचे मादक द्रव्यांद्वारा असे खच्चीकरण करायचे की, लष्करात भरती होण्यासाठी, प्रशासन चालवण्यासाठी, उद्योगधंदे चालू ठेवण्यासाठी कुशल आणि सामर्थ्यवान युवापिढी तयारच होऊ नये. यासाठी मादक द्रव्यांईतके भयंकर शस्त्र नाही. त्याचा आवाज होत नाही, बाॅम्ब प्रमाणे एखाद्याचा जीवही घेत नाही. मात्र जो त्याच्या आहारी गेला त्याच्या विचारशक्तीचा ताबा घेऊन व्यक्तीमत्व बदलवून टाकते. काही काळातच सेवन करणार्याचे रूपांतर जीवंत प्रेतात होते. अमेरिकेत झालेल्या प्रयोगाद्वारा सिद्ध झाले आहे की, आई किंवा वडील यापैकी एक किंवा दोघेही मादक पदार्थाचे व्यसनी असतील तर, त्यांना होणाऱ्या आपत्यांवर वाईट परिणाम होतो, याचा अर्थ सुस्पष्ट आहे की, एकामागोमाग एक पिढ्या नष्ट होत जातील. अंमली पदार्थ सेवन केल्याने स्त्रिया व पुरूषांमधे  वंध्यत्व येते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!