Home » सार्वजनिक गरबा रास समितीकडुन अकोल्यात जनजागृती; सदिच्छा भेटही

सार्वजनिक गरबा रास समितीकडुन अकोल्यात जनजागृती; सदिच्छा भेटही

by नवस्वराज
0 comment

अकोला : नवरात्र उत्सवाच्या काळात आयोजित करण्यात येणाऱ्या गरबा उत्सवादरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सार्वजनिक शक्ती जागरण गरबा रास समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने अकोल्यातील सर्व रास गरबास्थळं आणि देवस्थानांना भेट देत जनजागृतीला सुरुवात केली आहे.

समितीच्या सदस्यांनी जुने शहरातील श्री जागेश्वरी माता संस्थान, श्री माता महालक्ष्मी मंदिर येथुन प्रारंभ करीत परशुराम चौक नवदुर्गा उत्सव मंडळ, टावर चौक नवदुर्गा उत्सव मंडळ, श्री. नवदुर्गा नवरात्र महोत्सव मंडळ, दिपक चौक, श्री जूना कपड़ा बज़ार नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडल, अकोला गुजराती नवरात्री उत्सव मेहरबानू कॉलेज आदी गरबा आयोजनाच्या ठिकाणी भेटी दिल्या. आयोजकांशी संवाद साधत महिला व तरुणींच्या सुरक्षेबाबत चर्चा केली. या समितीच्यावतीने एक खास हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी महिला किंवा तरुणींनी या क्रमांकांवर संपर्क साधल्यास त्यांना काही क्षणात समितीचे सदस्य मदत करणार आहेत. प्रसंगी पोलिसांचीही मदत यासाठी घेण्यात येणार आहे.

गरबा उत्सवाच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या महिला व तरुणींना समाजकंटकांचा त्रास होणार नाही, याची दक्षताही समिती गरबा आयोजनकांच्या मदतीने घेत आहे.

सार्वजनिक शक्ती जागरण गरबा रास समितीचे अध्यक्ष रामप्रकाश मिश्रा, संयोजक भरत मिश्रा, डॉ. पार्थसारथी शुक्ला, अविनाश देशमुख, पवन पाडिया, संजय शर्मा , राधेश्याम शर्मा, अंबरीश शुक्ला, उमेश लखन, शशांक जोशी, ऋषिकेश जकाते, भूषण इंदोरिया, मयूर मिश्रा, सुधीर रांदड, पंकज कागलीवाल, मयूर मिश्रा, अमर तिवारी, अरविंद शुक्ला, सुरेंद्र जयस्वाल, संतोष वर्मा, राकेश शर्मा, कपिल रावदेव, सुनिल गोराने, मितांश मिश्रा, मीत पाड़िया आकाश सावते, तुषार काकड़ यासाठी प्रयत्न करीत आहेत. अॅड.ममता तिवारी, दीपिका ठाकूर, रुचिका इंदोरिया, भाविका मिश्रा, चंदा शर्मा, रितू मिश्रा, हिनाबेन शाह, सिमरन अम्मा, निशाबेन कड़ी, सोम्या अम्मा, नीलिमाबेन वोरा, अॅड . स्नेहल सावल, नेहा खंडेलवाल यासाठी समितीला सहकार्य करीत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!