नवी दिल्ली : भारतामधील तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा चटका सामान्यांना दिला आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. आज 6 जुलैपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे.
१४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमधील घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १ हजार ५३ रुपयांवर पोहचली आहे. पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडरची किंमत १८ रुपयांनी वाढली आहे. तर व्यवसायिक वापरासाठीच्या १९ किलो गॅस सिलेंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. एका वर्षात घरगुती सिलिंडरचा दर ८३४.५० रुपयांवरून आता सर्वत्र सरासरी १०५३ रुपयांवर पोहोचला आहे.