Home » मोफत धान्याची विक्री करणारे गरीब लाभार्थी

मोफत धान्याची विक्री करणारे गरीब लाभार्थी

by नवस्वराज
0 comment

अकोला : वार्षिक उत्पन्न साठ हजाराच्या आत असणाऱ्या रेशन कार्डधारकांना शासन एका व्यक्तीला गहू, तांदूळ दोन्ही मिळून दरमहीन्याला पाच किलो धान्य मोफत देते. कार्डधारकाच्या कुटुंबात दहा व्यक्ती असतील त्यापैकी चार व्यक्ती नोकरी, व्यवसाय करत असतील तर या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण कुटुंब पात्र आहे का? कारण अकुशल मजूर देखील किमान चारशे रूपये दररोज घेतो.

मोफत धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेकांची पक्के घर, महागड्या दुचाकी, स्मार्ट फोन व टिव्ही तसेच काहींकडे एअर कंडीशनर देखील आहेत. पुर्वी रेशनकार्डवर केरोसिन तेलाचे वाटप करण्यात येत होते. एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन व सिलिंडर असूनही अनेकांनी योजनेचा गैरफायदा घेतला, दामदुप्पट भावाने केरोसीनची विक्री करून रग्गड पैसा कमावला. प्रमाणिक नागरीकांना अर्धा लीटर केरोसिनसाठी वणवण भटकावे लागले.

मोफत मिळणाऱ्या धान्याची विक्री देखील जोरात सुरू आहे. धान्य खरेदी करणारे महानगरातील प्रत्येक भागात खुलेआम फिरतात. शासनाच्या मोफत धान्य योजनेचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेण्यात येत आहे. शासनाने आढावा घेऊन अपात्र लाभार्थींवर कारवाई करून लाभ देणे बंद करावे. ज्यांना खरोखर उत्पन्नाचे कुठलेही स्रोत नाही किंवा अत्यंत कमी आहे, कुटुंबातील इतर कुठलीही व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करत नाही अशाच गरजूंना या योजनेचा लाभ द्यावा. शासनाने ६० हजारांवर उत्पन्न असणाऱ्यांना देखील रास्त भावात धान्य पुरवावे. कारण धान्य पुरवठा करणाऱ्या दुकानाचे नावच रास्त धान्य दुकान आहे. याचा फायदा मर्यादीत लोकांना न देता सर्वांना देण्यात यावा अशी अपेक्षा आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!