अकोला : अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या अकोला येथे शुक्रवारी पोलीस दलाने दहशतवादी हल्ला झाल्यास करायच्या प्रतिबंधात्मक उपायांची मॉकड्रिल केली.
शुक्रवारी अकोला पोलिसांनी दहशतवादी हल्ला झाल्यास करायच्या प्रतिबंधात्मक उपायांची रंगीत तालीम केली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वात अकोला आकाशवाणी केंद्र येथे ही रंगीत तालीम करण्यात आली. दोन दहशतवादी आकाशवाणी केंद्रात शिरल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर कवायतीला सुरुवात करण्यात आली. दहशतवाद विरोधी पथक आणि अकोला पोलिसांनी एकत्रपणे ही कवायत राबवत संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. सिव्हिल लाइन्स परिसरात असलेल्या आकाशवाणी केंद्रात कवायत सुरू असताना मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही मॉक ड्रिल असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.