मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईतील एका व्याख्यानात पेशवे यांचे बद्दल अपमानजनक टिप्पणी केली तसेच औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा नसल्याचे सांगितले. कार्यक्रमाला शरद पवार देखील उपस्थित होते.
पेशवे हे नीच प्रवृत्तीचे असल्याचे सांगून त्यांनी राज्य कारभार इंग्रजांना सोपवल्यामुळे लोकांची सुटका झाली असे भालचंद्र नेमाडे कार्यक्रमात बोलेले. औरंगजेबाच्या दोन हिंदू राण्या होत्या शहाजहानची आई तसेच अकबराची बायको हिंदू होती. औरंगजेबाच्या सैन्यात अनेक हिंदू सरदार होते. काशिविश्वेश्वराचे मंदिरातील गाभाऱ्यात पंडे अनैतिक कारभार करतात, याची माहिती औरंगजेबाला मिळाल्यावर त्याने पंड्यांवर करवाई करून मंदिर तोडले, तो हिंदू द्वेष्टा नव्हता. सतीप्रथा इंग्रजांनी नव्हे तर औरंगजेबाने बंद केली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी मुसलमान असल्याचे त्यांनी काही पुस्तके, पत्र व लेखनाचा संदर्भ देऊन सांगितले. भालचंद्र नेमाडे यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात नवीन वादाला तोंड फुटू शकते.