Home » Akola News : मंदिरात वस्त्रसंहितेचे पालन करावे : सनातन संस्कृती महासंघ

Akola News : मंदिरात वस्त्रसंहितेचे पालन करावे : सनातन संस्कृती महासंघ

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : मंदिरात दर्शनासाठी येताना काही लोक अंगप्रदर्शन करणारे, उत्तेजक व तोकडे कपडे घालून येतात. मंदिर हे सिनेमा, जाहिरातीच्या चित्रीकरणाचा स्टुडिओ अथवा फॅशन-शोचा मंच नाही. ते एक पवित्र स्थळ आहे. त्यामुळे अशोभनीय कपडे घालून मंदिरात दर्शनासाठी येणे हा भारतीय संस्कृतीचा अपमान आहे. अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी सनातन संस्कृती महासंघाने केली आहे. (People Visiting Temple Wearing Indecent Dress Is Insult Of Indian Culture Sanatan Sanskruti Mahasangh From Akola Asked To Stop This)

मंदिरात दर्शनासाठी येताना अंगप्रदर्शन करणारे, उत्तेजक, तोकडे कपडे घालून दर्शनासाठी येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्यात येऊ नये. तशी सूचना असलेला फलक मंदिर व्यवस्थापनाने प्रवेश द्वारावर कायमस्वरूपी लावावा, या आशयाचे निवेदन सनातन संस्कृती महासंघातर्फे शहरातील मातृभक्त तपे हनुमान, मोठे संतोषी माता मंदिर, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, राणीसती धाम, अंबिका माता मंदिर, श्रीराम व हरिहर संस्थान, सालासर बालाजी मंदिर, श्री रामदेव व श्यामबाबा तसेच श्री राजराजेश्वर मंदिरचे विश्वस्त व व्यवस्थापन समितीला देण्यात आले.

मंदिराचे पावित्र्य कायम राहावे, भारतीय संस्कृती जीवंत राहावी या हेतूने सहकार्य करावे अशी आग्रही विनंती महासंघाचे ॠषीकेश जकाते, अमित शिरसाट, नरेंद्र कराळे, जयंत इंगळे, विनोद देव, हेमल खिलोसिया, अमित अग्रवाल, सुबोध देशमुख, अभिजीत कराळे, मीनाक्षी पवार, प्राजक्ता सपकाळ व हेमंत जकाते यांनी समस्त मंदिराच्या विश्वस्तांची भेट घेऊन केली. सर्व मंदिर विश्वस्त व व्यवस्थापन मंडळातर्फे सकारात्मक प्रतिसाद मिळाला, असे प्रसिद्धी प्रमुख विजय केंदरकर, मिलिंद गायकवाड व देवानंद गहीले यांनी कळवले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!