Home » चांद्रयानाच्या मोहीमेत मोलाचं योगदान देणारा नागपूरचा पठ्ठ्या

चांद्रयानाच्या मोहीमेत मोलाचं योगदान देणारा नागपूरचा पठ्ठ्या

by नवस्वराज
0 comment

नागपूर : चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान ३ सुखरुप स्थिरावलं आणि संपूर्ण देशानं आनंद साजरा केला. चांद्रयान-३ यशस्वी लँड होण्यासाठी इस्रोचे अनेक शास्त्रज्ञ रात्रंदिवस झटत होते. चांद्रयानासाठी झटणाऱ्या आणि देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील काही शात्रज्ञांनी आपलं मोलाचं योगदान दिलं आहे. चांद्रयान-३ च्या ऐतिहासिक मोहिमेत नागपूरकर युवा शास्त्रज्ञ अद्वैत दवने याचाही मोलाचा वाटा आहे. चांद्रयानाच्या सेन्सर टेस्टिंगची जबाबदारी ज्या टीमवर होती, त्या टीममध्ये अव्दैतचा सहभाग होता.

मुळचा नागरपूरचा अद्वैत दवने सध्या इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहे.  लहानपणापासूनच अव्दैतला अंतरळाबाबत कुतुहल होतं. अखेर वयाच्या बाराव्या वर्षी त्यानं मनाशी पक्कं केलं की, मी शास्त्रज्ञचं होणार. अन् त्यानंतर बरोबर एक तप म्हणजेच, १२ वर्षांनी अद्वैत दवने चांद्रयान-३ मोहिमेत इस्त्रोच्या टीममध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम पाहत होता. अद्वैत दवने चांद्रयान-३ मोहिमेत सेन्सर टेस्टिंगची जबाबदारी असलेल्या टीममध्ये होता.

सॉफ्ट लँडिंगच्या वेळेस तो मिशन ऑपरेशन कंट्रोल सेंटरमध्ये उपस्थित होता. महत्त्वाचं म्हणजे, शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न त्यानं वयाच्या बाराव्या वर्षीच पाहिलं होतं. इयत्ता नववीत असताना नासामध्ये स्पेस सायन्सशी संबंधित प्रोजेक्टसाठी त्याला निमंत्रित करण्यात आलं होतं.

अद्वैतचे वडील डॉ. प्रदीप दवने हे विभागीय फळ संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ आहेत, तर आई भारती दवने शिक्षिका आहेत. नागपूरच्या सोमलवार शाळेचा विद्यार्थी राहिलेल्या अद्वैतनं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे पुढील शिक्षण घेतलं. ऑप्टिकल इंजिनियरिंगमध्ये एम टेक करणारा अद्वैत कॉलेजमध्ये अव्वल राहिला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!