अकोला : महानगरातील अनेक रस्त्यांवर स्वच्छता व आरोग्याचे सर्व नियम धाब्यावर बसवून उघड्यावर मांस विक्री करण्यात येते. अनेक मुख्य रस्त्यांच्या बाजुला चौपाट्यांचे पेव फुटले आहे. चायनीज, पंजाबी, मिसळपाव, वडापाव, इडली- दोसा, पाणीपुरी, दुग्धजन्य पदार्थ, आमलेट, भूर्जी, चिकन, मटनची विक्री सर्रास सुरू आहे.
स्वीटमार्ट, हाॅटेल तसेच रेस्टॉरंट चालकांना शाॅप अॅक्ट, महानगरपालिका तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे परवाने काढावे लागतात. तपासणी दरम्यान काही त्रुटी व नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई होते. उघड्यावरील मांस व खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्यास काही धोका निर्माण झाला तर कारवाई कोणावर आणि कशी करणार.
अन्न व औषध प्रशासन तसेच महानगरपालिका आरोग्य विभागाने उघड्यावर सुरू असलेल्या मांस व खाद्यपदार्थांच्या विक्रीवर संयुक्तपणे कारवाई करून नागरीकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ ताबडतोब थांबवावा.