Home » Yavatmal News : वैनगंगा नदीत काकुसह दोन चिमुकल्या पुतणींचा बुडून मृत्यू

Yavatmal News : वैनगंगा नदीत काकुसह दोन चिमुकल्या पुतणींचा बुडून मृत्यू

Death by Drowning : अवैध रेती उत्खननाचे तीन बळी

by admin
0 comment

Yavatmal news : पैनगंगा नदीपात्रात बेसुमार अवैध रेती उत्खननामुळे झालेल्या खडुयातील खोल पाण्यात बुडून काकू आणि दोन पुतण्या मुत्यूमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना उघड झाली आहे. आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथे घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

प्रतीक्षा प्रवीण चौधरी (वय 35), अक्षरा निलेश चौधरी (12 वर्ष ), आराध्या निलेश चौधरी (वय 11 वर्ष ) अशी मृतकांची नावे आहेत. मृतक प्रतीक्षा या अक्षरा आणि आराध्या यांच्या काकू आहेत.
पूजेतील निर्माल्य विसर्जन करण्यासाठी प्रतीक्षा या कवठा बाजार गावालगत पैनगंगा नदीवर दुपारी गेल्या होत्या. त्यांच्या सोबत त्यांच्या सख्ख्या लहान पुतण्या अक्षरा आणि आराध्या देखील होत्या. निर्माल्य विसर्जन करीत असताना एका मुलीचा तोल जाऊन ती डोहात पडली. तिला वाचवण्यासाठी मदतीला धावलेली दुसरी मुलगी देखील डोहात बुडत असल्याचे पाहून काकूने मदतीसाठी उडी घेतली पण त्याही डोहात बुडाल्या. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली परंतु तोपर्यंत तिघींचे मृतदेह तरंगत वर आले होते.
काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेमुळे कवठा बाजार सह आर्णी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. नदी पात्रातील बेसुमार रेती उपसा या घटनेस कारणीभूत असल्याचे बोलले जात असून, रेती उत्खननामुळे तयार झालेल्या खोल खड्डयात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने तीन जीव गमवावे लागले आहेत. या घटनेमुळे गावकरी प्रचंड संतप्त झाले आहेत. गावकऱ्यांनी नदीपात्रात ठिय्या दिला असून प्रशासन घटनास्थळी दाखल होत नाही आणि रेती माफियांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका नातेवाईक व गावकऱ्यांनी घेतली आहे. घटनेतील मृतक हे महागाव येथील डॉ. अमर चौधरी यांचे नातेवाईक असल्याचे कळते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!