Nagpur | नागपूर : जुन्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानाच्या समोर फूटपाथवर गॅस फुग्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या सिलिंडरचा स्फोट झाला. सद भागात घडलेल्या या घटनेत पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तीन जण जखमी झाले. सज्जान आसिफ शेख असे मृत मुलाचे नाव आहे. अनमता आसिफ शेख (वय 24, रा. मानकापूर), आरिया शेख आणि फारिया शेख ही जखमींची नावे आहेत. (One Child Dead & Three Hurted In Gas Cylinder At Nagpur)
मानकापुरात राहणारे शेख कुटुंब कार ने घरी जात होते. सदरमधील जुना विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानाजवळ रस्त्याच्या बाजूला गॅसचे फुग्यांची विक्री करीत होता. सज्जानने गॅसचा फुगा घेण्यासाठी परिवाराकडे हट्ट धरला. फुग्यात गॅस भरत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. यात शेजारी उभा असलेला सज्जान पूर्णपणे भाजला. तीन जण जखमी झालेत. जखमींना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालात पोहचण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला. सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फुगे विक्रेता फरार आहे.