Home » आयओसीएलच्या सूर्य नूतन सौरचुलीचे आगमन

आयओसीएलच्या सूर्य नूतन सौरचुलीचे आगमन

by नवस्वराज
0 comment

नवी दिल्ली : देशातील प्रमुख तेल कंपनी इंडियन ऑयल कार्पोरेशनने सौर उर्जेवर चालणारी ‘सूर्य नूतन’ या इन्डोर सोलर कुकिंग सिस्टमचे उद्घाटन केले. केंद्रीय पोट्रोलियम आणि गॅस मंत्री हरदीप पुरी, ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह तसेच इंडियन ऑयल कार्पोरेशनचे अध्यक्ष माधव वैद्य उपस्थित होते.

चार सदस्य असलेल्या परिवाराचा नाश्ता, सकाळ, रात्रीचे जेवण यावर बनवता येईल. स्वयंपाकाचे उपकरण आत तर पॅनल बाहेर मोकळ्या जागी बसवले जातील, ज्याद्वारा उर्जा शोषत ती प्रणालीत संरक्षित केली जाईल. याच्या देखभालीचा कुठलाही खर्च येणार नाही. सूर्य नूतन तीन माॅडेलमध्ये उपलब्ध होईल.एल सूर्य प्रकाशात काम करेल, एलडीवर दुपार आणि रात्रीचा स्वयंपाक करता येईल. एलडीबीद्वारा नाश्ता तसेच दोन्ही वेळचा स्वयंपाक होईल. इंडियन ऑयल कार्पोरेशनने तूर्तास आरंभिक माॅडल सादर केले आहे. व्यवसायिकसाठीचे माॅडेल लवकरच येईल. अनेक ठिकाणी याची चाचणी घेण्यात आली. उपकरणाची किंमत १८ हजार ते ३० हजार रूपये असेल. शासन यावर अनुदान देखील देईल. त्यानंतर किंमत १० हजार ते १२ हजार रूपये असू शकते. यामुळे जैविक इंधनाची बचत होऊन, कार्बन उत्सर्जन देखील मोठ्या कमी होणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!