Home » डायमंड रेल्वे क्रॉसिंग पाहणाऱ्यांची संख्या वाढली

डायमंड रेल्वे क्रॉसिंग पाहणाऱ्यांची संख्या वाढली

by नवस्वराज
0 comment

नागपूर : संपूर्ण देशात केवळ नागपुरात असलेल्या डायमंड रेल्वे क्रॉसिंगला पाहण्यासाठी देशभरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. नागपुरातील या क्रॉसिंगमध्ये चार रेल्वे ट्रॅक एकमेकांना क्रॉस करतात. या क्रॉसिंगच्या मधोमध उभे राहिल्यास चारही दिशांना रेल्वे ट्रॅक दिसतात.

नागपुरातील हे डायमंड क्रॉसिंग २४ तास खुले असते. आता येथे नागरिकांना जास्त काळ थांबण्याची परवानगी दिली जात नाही. क्रॉसिंगच्या पूर्वेला गोंदियापासून एक रेल्वे ट्रॅक येतो. हा ट्रॅक हावडा-रूरकेला-रायपूर ट्रॅक म्हणून ओळखला जातो. दक्षिणेकडून एक ट्रॅक येतो. दिल्लीहून येणाऱ्या गाड्या उत्तर दिशेच्या ट्रॅकवरून येतात. या ठिकाणी पश्चिमेकडून म्हणजेच मुंबईकडून येणारा रेल्वे ट्रॅकही आहे. एकाच वेळी दोन रेल्वे क्रॉस होऊ शकत नसल्याने डायमंड क्रॉसिंगवरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. रेल्वेची टाइम मॅनेजमेंट यंत्रणा इतकी मजबूत आहे की, येथे कोणताही अपघात न होता डायमंड क्रॉसिंगवरून गाड्या सुरळीतपणे जाणे-येणे करतात.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!