Home » Akola Railway Station : अकोला रेल्वे स्थानकावर मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट 

Akola Railway Station : अकोला रेल्वे स्थानकावर मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट 

by नवस्वराज
0 comment

Akola | अकोला : महानगरातील रस्त्यांवर मोकाट कुत्रे, गायी, डुकरांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे अनेक वेळा अपघात देखील घडतात. नागरीकांना रस्त्यांवरून पायी चालणे तसेच वाहन चालवणे अवघड झाले आहे. मोकाट जनावरे रस्त्यावर घाण करतात. ‘अफ्रिकन स्वाइन’ची लागण झाल्यामुळे दररोज ५० ते ६० डुकरांचाचा मृत्यु होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोकाट कुत्र्यांनी नागरीकांवर प्राणांतिक हल्ला केल्याच्या बातम्या आणी व्हिडीओ बघायला मिळतात. (Number Of Stray Dogs Attack on Citizens In Akola Increased) या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.

अकोला रेल्वे स्थानकावर देखील मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामुळे प्रवासी त्रासले आहेत. (Passengers Fed Up Due To Stray Dogs At Akola Railway Platform) मोठा प्राणांतिक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!