Home » गडचिरोलीत कुख्यात नक्षलवाद्याला पकडले

गडचिरोलीत कुख्यात नक्षलवाद्याला पकडले

by नवस्वराज
0 comment

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील कांकेर पोलिस स्टेशनवर पाळत ठेउन घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा इरादा गडचिरोलीच्या नक्षलविरोधी पोलीस दलाने उधळवून लावला. पाळत ठेवणाऱ्या नक्षलवाद्याला विशेष मोहिम राबवून पकडण्यात आले. चैन राम उर्फ सुक्कु वत्ते कोसरा, वय ४८ हे पकडण्यात आलेल्या नक्षल्याचे नाव आहे. तो टेकामेटटा छत्तीसगड येथील रहिवासी आहे.

१३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. तो कोसरा पोलीसांच्या रडारवर होता. त्याच्यावर तब्बल सोळा लाख रूपयाचे बक्षिस होते. छत्तीसगड सिमेवरील जारावंडी सोहगाव जंगल परिसरात संशयित व्यक्ती पाळत ठेउन असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना मिळाली. त्यांनी तातडीने नक्षलविरोधी पथकाला यासंदर्भातील माहिती दिली. नक्षलविरोधी विशेष पथकाला त्याठिकाणी पाठवून अभियान राबविले. जारावंडी ते सोहगाव मार्गावरील कुरमावडा फाट्याजवळ चैनुराम हा संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याची तपासणी घेऊन चौकशी केली असता तो जारावंडी व पेंढरी पोलीस पथकावर पाळत ठेवून होता. येत्या काही दिवसात मोठा घातपात घडवून आणण्याचा बेत असल्याचे चौकशीतून समोर आले.

चैनुराम २००० मध्ये नक्षलांच्या पर्लकोटा दलममध्ये भरती झाला होता. २००३ मध्ये त्याच्यावर नक्षलांच्या विभागीय समितीच्या सहायक सदस्यपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर सतत ११ वर्ष तो नक्षल्याचे नंदनवन म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या माड विभागाच्या सदस्यपदी कार्यरत होता. २०१६ मध्ये चैनुरामला साहित्य पुरवठा विभागाच्या समितीत उपकमांडर म्हणुन बढती देण्यात आली होती. चैनुराम पोलीसांसोबत सात चकमकीच्या कारवाईत सहभागी होता. एका खुन प्रकरणात तो आरोपी आहे. पोलीस अनेक दिवसांपासून त्याच्या शोधात होते पण तो सतत चकमा देत होता. त्यानंतर पोलीसांनी चैनुरामवर १६ लाख रूपयाचे बक्षिस जाहीर केले होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!