Home » Nagpur News : बाजारगावातील सोलर कंपनीत भीषण स्फोट; नऊ कामगार ठार

Nagpur News : बाजारगावातील सोलर कंपनीत भीषण स्फोट; नऊ कामगार ठार

by नवस्वराज
0 comment

Nagpur | नागपूर : बाजारगावमध्ये असलेल्या सोलर कंपनीत रविवारी (ता. 17) सकाळी झालेल्या भीषण स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही कंपनी स्फोटके तयार करून संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांना पुरवठा करते. सत्यनारायण नुवाल हे कंपनीचे संचालक आहेत. (Nine Killed In Blast At Bazargaon In Nagpur District)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीत पॅकिंगचे काम सुरू असताना हा स्फोट झाला. त्यात 6 महिला व 3 पुरुषांचा मृत्यू झाला. युवराज चारोडे, ओमेश्वर मच्छीर्के, मिता उईके, आरती सहारे, श्वेताली मारबते, पुष्पा मानापुरे, भाग्यश्री लोणारे, ऋमिता उईके, मौसम पटेल ही मृतकांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगचे काम सुरू असताना स्फोटाची घटना घडली. ‘एक्सप्लोसिव्ह’मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो. हेच काम करत असताना स्फोट झाल्याची माहिती आहे. 2018 मध्येही या कंपनीमध्ये स्फोट झाला होता. त्यावेळी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.

सध्या बाजारगावातील या कंपनीत एनडीआरएफ, अग्निशमन दल, नागपूर ग्रामीण पोलिस तळ ठोकून आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती मिळताच बाजारगावकडे धाव घेतली. रुग्णवाहिकांसाठीही मदत केली. प्रकरणाचा सखोल तपास सध्या सुरू आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!