मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना नरेंद्र दाभोळकर यांच्याप्रमाणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवर ही धमकी दिली आहे. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. हे ट्विटर खाते फेक नावाने सुरू करण्यात आले असावे, असा संशय व्यक्त होत आहे.
यापूर्वीही डिसेंबर २०२२ मध्ये शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी वेगाने सूत्र फिरवत धमकी देणाऱ्याला अटक केली होती. मात्र पुन्हा एकदा पवारांना धमकी देण्यात आल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात अधिकृतपणे तक्रार दाखल केली आहे. शरद पवार यांच्या भाजपाच्या नेत्यांनी औरंगजेबाची उपमा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाच्या विरोधात आंदोलन करण्याचा ईशाराही राष्ट्रवादीने दिला आहे. राजकीय वातावरण तापत असतानाही पवारांना मारण्याची धमकी मिळाल्याने वातावरण अधिकच गंभीर झाले आहे.