अकोला : स्वातंत्र्य तसेच प्रजासत्ताक दिनाच्या आधी कागदी तसेच प्लास्टिकचे राष्ट्रीय ध्वज, स्टीकर आणि बिल्ल्यांची जोरात विक्री होते. बरेच वेळा ध्वज पायदळी तुडवल्या जातात. मागील वर्षापासून शासन “हर घर तिरंगा” अभियान राबवते आहे. पोस्ट ऑफिस तसेच महानगरपालिका तर्फे राष्ट्रीय ध्वज विकले जात आहेत. सर्व नागरिकांनी आपल्या घरांवर राष्ट्रीय ध्वज उभारावेत असे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.
परंतु महानगरातील रस्त्यांवरील हातगाड्यांवर देखील ध्वजांची विक्री करण्यात येत आहे. ध्वज टेबल क्लाॅथ सारखे गाडीवर आंथरून ठेवल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी ध्वज चुरगळलेले तसेच जमीनी पासून अत्यंत कमी उंचीवर उभारण्यात आले आहेत.
प्रशासनाने राष्ट्रीय ध्वजाच्या खुल्या विक्रीची परवानगी देऊ नये. घरे तसेच व्यवसायिक प्रतिष्ठांनांवर ध्वज उभारताना ध्वजाचा अवमान होऊ नये म्हणून नागरीकांना याबाबत वृत्तपत्रांतून तसेच टिव्ही चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे.