Home » Narendra Modi : बचत गटांच्या महिलांशी यवतमाळात साधणार संवाद

Narendra Modi : बचत गटांच्या महिलांशी यवतमाळात साधणार संवाद

Saving Group : फेब्रुवारीत पंतप्रधान येणार पश्चिम विदर्भात

by नवस्वराज
0 comment

Yavatmal : बचत गटांच्या पाच लाख महिलांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवार, 11 फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. अलिकडेच पंतप्रधान मुंबई, नाशिक आणि सोलापूर येथे विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने येवून गेले. आता पाचव्यांदा ते महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यात दौऱ्यावर येणार आहेत. दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.

दौऱ्यासाठी सोमवारी (ता. 29) जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांची महत्वाची बैठक बचत भवन येथे घेतली. यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे चार महिन्यांपूर्वी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोहरादेवीचे निमंत्रण देण्यासाठी गेले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी हे फेब्रुवारी महिन्यात पोहरादेवी (जि. वाशिम) येथील विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी येणार असल्याची चर्चा होती. मात्र, पंतप्रधानांच्या संभाव्य दौरा कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी यवतमाळ जिल्हा प्रशासनावर सोपविण्यात आल्याने ते वाशिम ऐवजी यवतमाळ जिल्ह्यातच येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात एक तरी मोठी सभा घेतात, असा जणू पायंडाच पडला आहे. 2014 मध्ये आर्णी तालुक्यातील दाभडी येथे नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तेंव्हा नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. 2019 मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी केळापूर (पांढरकवडा) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. आता तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ येथे येणार आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!