शेगाव : खान्देश, विदर्भ ते कोकण जोडणाऱ्या आणि कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नागपूर- मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसला ४ ऑक्टोबरपासून शेगाव येथे थांबा देण्यात आला आहे.
कोकणातून शेगांवला जाणार्या भक्तांची मागणी या थांब्यामुळे पूर्ण झाली आहे. विदर्भातील शेगांव येथील गजानन महाराज संस्थानची विदर्भ पंढरी म्हणून ओळख आहे. गजानन महाराज संस्थानकडुन देण्यात येणार्या सोयी-सुविधा, शिस्त,पारदर्शी कारभार यामुळे येथे भाविकांची सदैव गर्दी राहते. राज्याच्या विविध भागातून तसेच देशभरातून भाविक शेगांवला येतात. त्यात विदर्भ, कोकणला जोडणाऱ्या नागपूर-मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसला ४ ऑक्टोबरपासून शेगांव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.