Home » नागपुरातील वज्रमूठ सभेपासून ‘मविआ’ला मोठी आशा

नागपुरातील वज्रमूठ सभेपासून ‘मविआ’ला मोठी आशा

by नवस्वराज
0 comment

नागपूर : उपराजधानी.. संघभूमी आणि भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या नागपुरातील वज्रमूठ सभेपासून महाविकास आघाडीला मोठी अपेक्षा आहे. ही सभा आयोजित करण्याला भाजपाच्या एका गटाकडून विरोध होत आहे, तर शहराध्यक्ष प्रवीण दटके यावर मौन आहेत. आमदार कृष्णा खोपडे यांनी विरोधात्मक भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे.

महाविकास आघाडीने या सभेची मुख्य जबाबदारी माजी मंत्री सुनिल केदार यांच्यावर सोपविली आहे. केदार यांचा या भागात मोठा दबदबा आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख कारागृहात गेल्यानंतर या भागात केदार यांचे वर्चस्व वाढले आहे. त्यामुळे वज्रमुठ सभेची जबाबदारी केदार यांच्यावर सोपविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सभेच्या तयारीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते श्रम घेत आहेत. संभाजीनगरच्या सभेपेक्षाही दुप्पट लोक नागपुरातील वज्रमुठ सभेला येतील असा दावा करण्यात येत आहे. मैदानावर किमान ७० हजार लोकांचा समुदाय बसलेला असेल. इमारती आणि बाहेर रस्त्यावरती एकूण लाखभर लोक उपस्थित असतील, असा दावा करण्यात येत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!