Akola News : शहरातील श्री भोलेश्वर मंदिरात खास सभा घेण्यात आली. होलिका दहनाबाबत या बैठकीत मुहूर्तावर विचार करण्यात आला. होलिका दहन 24 मार्च रोजी होणार आहे. शास्त्रोक्त आधार घेऊन विविध मुहूर्त ठरविण्यात आलेत.
होला अष्टक आणि सम्राट पंचांगानुसार होळीच्या दिवशी रात्रीपासून आणि अन्य पंचांगानुसार रविवार 17 मार्च सकाळपासून होला अष्टक लागेल. एकादशी बुधवारी दुपारी 1 वाजून 18 मिनिट आधी चाकोला ढाल-तलवार ठेवावी लागेल. त्यांनतर दुपारी भद्रा लागत आहेत. होलीका दहनासाठी रविवार 24 मार्च रोजी पौर्णिमा तिथी सकाळी 09 वाजून 54 मिनिटांपासून लागत आहे. भद्रा असल्याने रात्री 11:12 मिनिटांपर्यंत होलिका दहन करता येत नाही. त्यामुळे या काळात होलिका दहन केल्याने राष्ट्रावर संकट येते. हवामानामुळे नुकसान होते. होलिका दहन 11:12 मिनिटांनंतर करावे.
होलिका दहनाचे या उत्सवात महत्व असते. काही ठिकाणी परंपरागत होलिका दहन करण्यात येते. याशिवाय गणगौरचे उद्यापन यावर्षी करता येईल. या वर्षात गुरू आणि शुक्र ग्रहाचा अस्त नाही. मुहूर्त चिंतामणी, निर्णय सिंधु, व्रत राज ,महाराष्ट्रीयन पंचांग, सम्राट वल्लभ, मणीराम निर्णय, सागर काशी पंचांग यांचा आधार घेऊन हे मुहूर्त निश्चित करण्यात आले आहेत. मुहूर्त निश्चित करण्यासासाठी अकोल्यात आयोजित सभेत पंडित रतन तिवारी, गोपाल शर्मा (भागवताचार्य), राजकारण तिवारी (साहित्य आचार्य), रजनीकांत जाडा, सुमित तिवारी, प्रमोद तिवारी, भैरू शर्मा, श्याम अवस्थी, पंडित रवी कुमार शर्मा उपस्थित होते.