Baramati (Pune) | बारामती (पुणे) : महावितरण कंपनीला विजचोरी होत असल्याची माहिती मिळाल्यावरून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 6 एप्रिल 2022 रोजी सासवड येथील साईनाथ आईस फॅक्टरीची तपासणी केली. त्यात ग्राहकाला 2 लाख 34 हजार 243 युनिटची विजचोरी केल्याप्रकरणी 35 लाख 86 हजाराचा दंड आकारला. ( MSEDCL Baramati Charged Penalty Of 35 Lakh Towards Theft Of Electricity TO Ice Factory Consumer)
आकारणी केलेला दंड आणि वीजपुरवठा जोडून देण्याबाबत फॅक्टरीचे मालक नारायण दगडू पवार यांनी दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला. दिवाणी न्यायालयाने दंडाची रक्कम कायम ठेवल्याने पवार यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. जिल्हा न्यायालयाने देखील महावितरण कंपनीने आकारलेला दंड भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करता येणार नाही, असा निर्णय दिला.
प्रकरण न्यायप्रविष्ट असताना महावितरण कंपनीच्या पुणे येथील भरारी पथकाने 15 मार्च 2023 रोजी साईनाथ आईस फॅक्टरीने दुसर्यांदा मीटर बायपास करून वीजचोरी केल्यामुळे ग्राहकाला पुन्हा 22 लाख 32 हजाराचा दंड आकारला. ही रक्कम ग्राहकांने भरली मात्र प्रथम विजचोरीच्या दंडाच्या रक्कमेचा पूर्ण भरणा केला नसल्याने वीजपुरवठा पूर्ववत सुरू करता येणार नाही असा महावितरण कंपनीचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायालयाने ग्राहकाचा अर्ज फेटाळला.